जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. बीड जिल्ह्यात बसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर आज (Jalna News) जालना तालुक्यातील रामनगर परिसरात (Maratha Aarkshan) तहसीलदार छाया पवार यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळू लागले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) गावागावात मराठा आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. नेत्याबरोबरच आता प्रशासनाचा विरोधातही मराठा समाजाचा आक्रोश वाटताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात बसवर दगडफेक व बस जाळण्याचे प्रकार घडले आहेत. यानंतर आज शासकीय अधिकारी असलेल्या महिला तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गावात प्रवेश करण्यास केला विरोध
तहसीलदार छाया पवार या आपल्या कामानिमित्त महसूल विभागाच्या शासकीय वाहनातून जात असताना मराठा समाजाच्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांना गावात प्रवेश करण्यास विरोध केला. मात्र तहसीलदार वाहनातून गावाकडे जात असताना संतप्त झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.