POCRA Scam : जालन्यात पोकरा योजनेमध्ये अडीच कोटींचा घोटाळा; शेडनेटसाठी ३९ लाभार्थ्यांना नियमबाह्य लाभ

POCRA Scam News Jalna: शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना आणि साहित्य उपलब्ध करून दिले जात असते. हा सर्व साहित्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेंतर्गत अनुदानावर दिले जात असते.
POCRA Scam News Jalna
POCRA Scam News JalnaSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेत अडीच कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे लेखा परीक्षणात उघडकीस आले आहे. दरम्यान पोकरा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनीच यात अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यात नियमबाह्य लाभार्थी असल्याचे समोर येत आहे.  

शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना आणि साहित्य उपलब्ध करून दिले जात असते. हा सर्व साहित्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेंतर्गत अनुदानावर दिले जात असते. यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होत असतो. अर्थात खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात असल्याचे जालन्यात समोर आलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.  

POCRA Scam News Jalna
Sambhajinagar ZP : संभाजीनगर जिल्हा परिषदेत मोठा घोटाळा; काम न करता अधिकाऱ्यांनी काढली ४ कोटींची बिले

३९ लाभार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने लाभ 

जालना जिल्ह्यात शेडनेटसाठी नियमबाह्य ३९ लाभार्थ्यांना अडीच कोटींचा लाभ दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी गैरप्रकार करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले होते. मात्र पंधरा दिवसानंतर हे आदेश मागे घेत विभागीय चौकशीनंतरच गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे.

POCRA Scam News Jalna
Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी; माहूर मंडळात सर्वाधिक पाऊस

आणखी गैरप्रकार समोर येण्याची शक्यता 

जालना जिल्ह्यात ठिबक सिंचन, अवजार बँक आणि गोदाम हाऊस तसेच भाजीपाला फळ वाहतूक वाहन खरेदीची चौकशी झाल्यास आणखी गैरप्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोखरा योजनेमध्ये दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com