Laxman Hake VIDEO | ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोर रडले, खंतही बोलून दाखवली!

OBC Leader Laxman Hake Hunger Strike VIDEO: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोर रडताना दिसले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोर रडले
Laxman Hake VIDEOSaam Tv

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आज रडल्याचं पाहायला मिळालं आहे. ओबीसी समाजाची राजकीय ताकद संपली, अशी खंत लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलीय. यावेळी बोलताना हाके यांना अश्रू अनावर झाले होते.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन तब्येतेची विचारपुस केली. शासनाचा अधिकृत संदेश आला नाही. उपचार घ्या सांगणं डॉक्टरचं काम असल्याचं हाके म्हटले आहेत. ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाके यांना अश्रु अनावर झाले होते. ओबीसीला चेहरा आहे का? पॉलिटिकल पावर संपली ( OBC Leader Laxman Hake Hunger Strike VIDEO) आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात आम्हाला दुय्यम वागणूक मिळत आहे, पुरोगामी महाराष्ट्र नाही. लोकांचे तांडेचे तांडे येत आहे. ऊसतोड कामगार मुकादम याचं शिष्टमंडळ आलं होतं, असं सांगत लक्ष्मण हाके भावनिक झाले (OBC Reservation Protest) होते. जरांगेच्या आंदोलनाला राज्य सरकार रेड कार्पेट टाकून लोटांगण घालत येतं. मात्र, आठ दिवस झाले आम्हाला शिष्टमंडळसुद्धा भेटायला येत नाही. आम्हाला कोणाच्या ताटातलं आरक्षण हिसकवून घ्यायचं नसल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोर रडले
EXCLUSIVE VIDEO : मनोज जरांगेंचा आणि आरक्षणाचा संबंध काय?, OBC आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंचा रोखठोक सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस, अजित पवार यांनी सगळ्यांनी ठरवून ओबीसी समाजाचं अस्तित्व संपवायच ठरवलंय. ओबीसींकडे कुठले लक्ष न देता ओबीसींचं मतदान त्यांना मिळत (Jalna News) गेलं. ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊ नये रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी प्रकाश आंबेडकर यांच्या हाताने पाणी पिलंय. परंतु त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

लक्ष्मण हाके कॅमेऱ्यासमोर रडले
Maratha VS OBC Aarakshan: राज्यात आरक्षणा आंदोलनांचा भडका, आता ओबीसी आरक्षण आंदोलन पेटलं; जरांगे आणि हाके आमनेसामने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com