अक्षय शिंदे
जालना : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिणामी सध्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात शस्त्र परवाने रद्द करण्याच्या प्रक्रिया सुरू असतानाच जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आले आहे. यामुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींचे बंदूक परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जालना पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अनेकजण बंदूक किंवा शस्त्र वापरण्याचा परवाना काढलेला असतो. मात्र परवाना काढल्यानंतर याचा काहीजण दुरुपयोग करत क्राईमच्या घटना घडवत असतात. राज्यात अशा घटना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील याची आता तपासणी करण्यात येत असून जालन्यामध्ये देखील पोलीस प्रशासनाकडून शस्त्र परवनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात ६५२ परवाने
दरम्यान जालना जिल्ह्यात ६५२ परवाने असून त्याची देखील तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर शस्त्र परवाना दिल्यानंतर बऱ्याच लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने त्याची तपासणी सुरु करण्यात आली असून हि तपासणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच हि तपासणी पूर्ण करून त्या अनुषंगाने कारवाई केली जाणार आहे.
शस्त्र परवाना होणार रद्द
मागील वर्षी १६ गावठी पिस्तूल, १०० पेक्षा जास्त तलवारी जप्त केल्या असल्याची पोलिसांची माहिती आहे. जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने (बंदूक आणि इतर शस्त्रे) रद्द केले जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे. परवान्यांची तपासणी करून याबाबत लवकरच याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याची माहिती अजयकुमार बंसल यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.