Jalna News : जेसीबीचा धक्का लागला अन् बाप-लेक थेट विहिरीत कोसळले, दुर्दैवी घटनेत बापाचा मृत्यू

भोकरदन तालुक्यातील चांदाई एक्को गावातील मन सुन्न करणारी घटना...
Jalna News
Jalna NewsSaam TV
Published On: 

Latest Jalna News : भोकरदन तालुक्यातल्या चांदाई एक्को गावातील शेतात विहिरीचे काम सुरु असताना जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने वडील आणि मुलगा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत जगण शामराव इधाटे हे 57 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाले आहेत तर त्यांचा मुलगा रघुनाथ इधाटे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Jalna News
Congress News : काँग्रेसच्या माजी आमदारावर दराेड्याचा गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी (Doctor) दिली आहे. जगणं इधाटे यांच्या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू असताना त्यांचा मुलगा आणि ते विहिरी जवळ उभे होते. यावेळी अचानक त्यांना काम करत असलेल्या जेसीबी (JCB) मशीनचा धक्का लागला आणि ते दोघे ही विहिरीत पडले.

Jalna News
Sanjay Gaikwad: 'आम्ही 125 ते 130 जागा लढवणार...' बावनकुळेंच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड आक्रमक

ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातल्या चांदाई एक्को गावातील शेतात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmer)विहरीकडे धाव घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयन्त केला.

मात्र या घटनेत जगणं इधाटे यांचा मृत्यु झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com