Jalna News: बोगस सोयाबीन बियाणे प्रकरण.. अखेर पाच दिवसानंतर तिघांवर गुन्हा दाखल

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरण.. अखेर पाच दिवसानंतर तिघांवर गुन्हा दाखल
Jalna News Bogus Seeds
Jalna News Bogus SeedsSaam tv
Published On

जालना : भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे फाट्याजवळ असलेल्या पूर्णा- केळणा शेतकरी उत्पादक संघाच्या गोदामात नामांकित कंपनीच्या नावाने सुरू असलेल्या (Bogus Seeds) बोगस बियाणे आढळून आले होते. या प्रकरणी कृषी अधिकारी यांच्‍या तक्रारीवरून पाच दिवसांनी तीन जणांवर गुन्‍हा (Jalna News) दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jalna News Bogus Seeds
Jalgaon Bribe Case: बदली आदेश स्थगिती चेकनेच घेतली लाच; मुख्याध्यापकासह संस्‍थाध्‍यक्ष, लिपिक ताब्‍यात

जालना जिल्‍ह्यातील बोगस बियाणे कारखान्यावर कृषी विभागाणी टाकलेल्या छाप्यात २८ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या बोगस सोयाबीन विविध कंपन्याच्या नावाने पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अखेर भोकरदन तालुका कृषी अधिकारी राजेश तांगडे यांच्या तक्रारीवरून तब्बल पाच दिवसानंतर भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये तेलंगणातील सिड्स कंपनीच्या कुलिपाका अमुलकुमार शंकर, सुनील भाऊसाहेब कन्हाळे, विजय गंगाराम म्हस्के या तीन संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी तेलंगणातील सिड्स कंपनीच्या कुलिपाका अमुलकुमार शंकर आणि छत्रपती संभाजीनगर येथील बिडनेस ॲग्रोवेट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची नावे समोर आल्यामुळे या बोगस बियाणे प्रकरणी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता भोकरदन पोलीस अधिक तपास करत आहे.

Jalna News Bogus Seeds
Buldhana News: दोन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; खेळत असताना तोंडावर टाकले गुंगीचे औषध

कारवाईवर शंका

दरम्यान कृषी विभागाच्या या धाडीनंतर तब्बल पाच दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात (Bhokardan) आल्याने व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर हा कारखाना सुरू होता. यामुळे कृषी विभागाच्या कारवाईवर शंका व्‍यक्‍त केली जात आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात येत आहे.

Jalna News Bogus Seeds
Sangli News: गांजा विक्री करणारा रिक्षा चालक ताब्‍यात; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

बोगस बोगस बियाणे प्रकरणी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तर आजपासून गाव पातळीवर ग्रामसेवक तलाठीसुद्धा कुठे असा प्रकार होत असेल, तर त्यावर कारवाई करेल. लवकरच मी सांगितलेल्या प्रमाणे राज्यात बोगस बियाणे प्रकरणी कायदा अमलात आणल्या जाईल असं साम टीव्ही शी बोलताना म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com