Jalna HSC Exam Copy : बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी उडाला कॉपीमुक्त अभियनाचा फज्जा; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल,VIDEO

Jalna HSC Exam Copy Video : राज्यात बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉपीमुक्त अभियनाचा फज्जा उडाला आहे. कॉपी बहाद्दर लोकांचा व्हिडिओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.
jalna latest News
jalna Saam tv
Published On

राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज बारावीचा पहिला पेपर होता. बारावीच्या पहिल्या पेपरच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहेत. मात्र. जालन्यात या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जालन्यातील परीक्षा केंद्रावर कॉपीसाठी मदत करणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

jalna latest News
jalna News : मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई, जालन्यात प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर

जालना जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियनाचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ढोकसाळ येथे एका परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. कॉपी पुरवणाऱ्यांनी शाळेच्या कंपाउंडवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम केल्याचे समोर आलं आहे.

आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. पहिल्याच पेपर दिवशी कॉपीबहाद्दर लोकांनी भरारी पथकाचे वाभाडे काढल्याचे समोर आलं आहे. जालना जिल्ह्यातील एकूण ८२ केंद्रावर ३६ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातील काही केंद्रावर अशाच प्रकारे दृश्य पाहायला मिळालं.

jalna latest News
Jalna Crime : २१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं, गावाच्या गायरान भागात फेकलं; मृतदेह बघून जालन्यात खळबळ

दरम्यान, मागील काही वर्षांत बारावीच्या केंद्रावर अनेक कॉपीचे गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील बहुतेक परीक्षा केंद्रावर 'पर्यवेक्षण टीम रोटेशन' करण्यात येणार आहे. कॉपीसारखा गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यासह तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

jalna latest News
Jalna Police : घरात साठवलेला ९ लाखांचा गांजा जप्त; गोंदी पोलिसांची कारवाई

पहिल्याच दिवशी ४२ गैरप्रकरणाची नोंद

राज्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकरणाची नोंद झाली आहे. आज पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर होता. आजपासून ९ विभागीय मंडळात बारावी परीक्षा सुरू झाली आहे. सर्वाधिक २६ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मुंबई,कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार आढळला नसल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झाल्यास, त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही बडतर्फ करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com