Jalna News : जालन्यात अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या पथकावर हल्ला; कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Jalna latest News : जालन्यात अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
jalna
jalnaSaam Digital
Published On

jalna News :

जालन्यात अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पथकातील कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. तसेच आरोपींनी गाड्यांची तोडफोड केली आहे. (Latest Marathi News)

जालना अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या पथकातील वाहनावर घनसावंगी तालुक्यातील भादली,शिवणगाव शिवारात गुरुवारी मध्य रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियानी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या खासगी वाहनांवर हल्ला झाल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेले तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे.

jalna
आरफळ कॅनॉलमध्ये बुडून आरोहीचा मृत्यू; 'दुर्गा' स शाेधताहेत ५० युवक

अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांना घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी महसूल विभाचे पथक घेऊन गुरुवारी मध्यरात्री सुमारास भादली,शिवणगाव शिवारात कारवाईसाठी गेल्या होत्या.

त्याच दरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर पथकानी कारवाई करत हे वाहन जप्त करुन पथक घनसावंगी पोलीस ठाण्याकडे जात असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या साथ ते आठ जणांच्या वाळू माफियांनी पथकाला अडवून पथकातील कर्मचाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला चढवत अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या रिता यांच्या कारवर लोखंडी रॉड आणि दग़डफेक करत हल्ला चढवला.

या हल्ल्यात अप्पर जिल्हाधिकारी मेत्रेवार ज्या खासगी वाहनात बसल्या होत्या, त्याचं वाहनावर हल्ला झाल्याने त्यांना वाचवण्यासाठी पथकातील अनेक कर्मचारी धावून गेले. मात्र या हल्यात तीन ते कर्मचारी गंभीर जखमी झाले तर चार ते पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले अप्पर जिल्हाधिकारी मेत्रेवार यांनी तात्काळ जखमी कर्मचाऱ्यांना उपचारसाठी दाखल केले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या पथकावर झालेल्या या हल्याने अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खबळ उडाली आहे.

jalna
Bhagwant Karad News | भागवत कराड लोकसभा लढण्यास इच्छुक? | Marathi News

या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रवीण नारायण गजरे यांच्या तक्रारी वरून घनसावंगी पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपी वामन परशुराम तौर,सुरेश तुकारान आर्दड,सुभाष तळीराम आर्दड,सचिन सोमनाथ साळवे,विशाल रमेश खरात यांच्या सह चार ते पाच जणांविरुद्ध शासकीय पथकाला अडून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कर्मचाऱ्यांना जब्बर मारहाण करुन पथकावर हल्ला केल्या प्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com