Jalna Crime : जालन्यात भरदिवसात घरफोडी; सराईत गुन्हेगार २४ तासात ताब्यात, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalna News : लग्नसराई तसेच सुट्या असल्यामुळे अनेकजण घराला कुलूप लावून बाहेरगावी जात आहेत. याचा फायदा चोरटे उचलत असून बंद घर फोडून दागिने तसेच रोकड लांबवत आहेत. दिवसा देखील चोरटे संधीचा फायदा घेत आहे
Jalna Crime
Jalna CrimeSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना शहरातील चौधरी नगर येथे दोन दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडी झाली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोरट्याला जेरबंद केले आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

चोरट्यांचा सध्या धुमाकूळ सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. लग्नसराई तसेच सुट्या असल्यामुळे अनेकजण घराला कुलूप लावून बाहेरगावी जात आहेत. याचा फायदा चोरटे उचलत असून बंद घर फोडून दागिने तसेच रोकड लांबवत आहेत. दिवसा देखील हे चोरटे संधीचा फायदा घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशाच प्रकारे जालना शहरात भर दुपारच्या वेळी घरफोडी करण्यात करत दागिने लांबविण्यात आले होते.

Jalna Crime
Heavy Rain : गरिबीचा संसार, मोलमजुरी करून गाडा हाकतोय, पावसानं माती केली; पावसामुळे सडलेला कांदा पाहून शेतकरी महिलेचे अश्रू अनावर

चोरटा मुद्देमालासह ताब्यात 

दोन दिवसापूर्वी जालना शहरातील चौधरी नगर येथे भर दिवसा घरफोडी करून घरातील सोने आणि रोख रक्कम या चोरट्यांनी पळवली होती. याप्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. पोलिसांनी भर दिवसा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला २४ तासात बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जालना जिल्ह्यातील अजून पाच ते सहा घरफोडीचे गुन्हे या आरोपीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Jalna Crime
Fake Notes : १० हजार रुपयांच्या बदल्यात पाचशेच्या २० हजार रुपयांच्या बनावट नोटा; गेवराईत दोन जणांवर गुन्हा दाखल

तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची संयुक्त कारवाई
जालन्यातील चौधरी नगर परिसरामध्ये भर दिवसा घरफोडी झाल्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण होते. या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाची चक्री फिरवली आणि 24 तासात आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. तालुका पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास खार्डे, जगदीश बावणे आणि तालुका पोलीस ठाण्याचे मानसिंग बावरे, विलास आटोळे, कृष्णा भडांगे, विशाल काळे आणि चालक जायभाये, बाळू ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com