जालना : अवैध वाळू माफियांकडून बदनापूर (Badnapur) तालुक्यातील डोंगरगाव जवळ राजूर-फुलंब्री महामार्गावर पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष दानवे या वाळू माफियावर (Sand Mafia) बदनापूर तहसीलदार यांनी 353 चा गुन्हा दाखल केला होता. वाळूचा हायवा ट्रक ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना, सदर ट्रक गिरिजा नदी पात्रातून अवैध वाळू (Sand) घेऊन डोंगरगाव मार्गे दाभाडीकडे येत असल्याची माहिती मिळाली. (Jalna Badnapur Attack On Police By Sand Mafia)
हे देखील पहा :
पोलिसांनी डोंगरगाव (Dongargaon) शिवारात हायवा ट्रक (Truck) अडवला असता, ट्रक चालकाने, पोलिसांनी आपला ट्रक अडवल्याची माहिती वाळू माफियांना दिली. मारुती स्विफ्ट कार मधून आलेल्या दोन महिला आणि चार ते पाच जणांनी पोलिसांवर (Police) अचानक हल्ला चढवल्याने आणि वाळूमाफियाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांना वाचवण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला.
या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक रामोडे हे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनटेवाड यांनी घटनासाठी धाव घेऊन जखमी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांना उपचरासाठी दाखल करत हायवा, मारुती स्विफ्ट कार, दोन महिला व चार जणांना दाब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.