Jalna Crime: सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल 1.80 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Anti-Corruption Bureau Action: जालना जिल्ह्यातून दिवसागणिक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आता यातच चक्क एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने लाच घेतली आहे.
Jalna API and constable caught taking bribe in Maharashtra
Jalna API and constable caught taking bribe in Maharashtra Saam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून, 1 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड आणि कॉन्स्टेबल गोकुळदास देवळे यांनी एका वाळू वाहतूकदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. संबंधित वाहतूकदाराकडून एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली जात होती.

Jalna API and constable caught taking bribe in Maharashtra
Jalna Crime: धक्कादायक! आधी चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम केला, नंतर तरुणाला निर्वस्त्र करून चटके दिले

याच दरम्यान, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आष्टीतील एका ज्यूस सेंटरवर कारवाई करत आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिघांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

Jalna API and constable caught taking bribe in Maharashtra
Jalna Police : वाळू माफियांची परेड; जालना पोलिसांनी ३० माफियांकडून लिहून घेतले बंदपत्र

या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com