शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा जळगावात निषेध

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा जळगावात निषेध
NCP
NCPSaam tv
Published On

जळगावः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन करत हल्ला केला. याचा जळगावात राष्‍ट्रवादीतर्फे (NCP) निषेध करण्यात आला. (jalgoan news Protest against attack on Sharad Pawar residence in Jalgaon)

NCP
काही क्षणात होत्याचे नव्हते..घराला आग लागून संसार जळून खाक

राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांचा सिल्वर ओक बनगल्यावर काही एसटी कर्मचारींनी असभ्य वर्तन केले. बंगल्‍यावर चपला व दगड मारून आंदोलन केले. या मागे कोणत्या राजकीय शक्तिचा हात आहे. असे गुंड प्रवृतीच्‍या लोकांना कड़क शासन व्हावे कायदा हातात घेणारे लोकांना त्वरित अटक करुंन कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवदेन (Jalgaon) जिल्‍हाधिकारी यांना देण्यात आले.

घोषणाबाजी करत निषेध

राष्‍ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com