Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam tv

Jalgaon: जिल्हा परिषद आरक्षणात दिग्गजांना झटका

जिल्हा परिषद आरक्षणात दिग्गजांना झटका
Published on

जळगाव : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांचे गट आरक्षीत झाल्याने त्यांना रिंगणाबाहेर राहावे लागणार आहेत. काही जणांच्या गट आरक्षीत झाले (Jalgaon News) असले तरी महिला किंवा मुलीला संधी मिळणार आहे. (Jalgaon Zilha Parishad News)

Jalgaon ZP
Jalgaon: पतीचा कोरोनात मृत्‍यू; उपजिविकेचे साधन नसल्‍याने चक्‍क आईने मुलांना काढले विक्रीला

जिल्हा परिषद (Zilha Parishad) अध्यक्ष भाजपच्या रंजना पाटील यांचा मतदार संघ सर्वसाधारण राखीव आहे, त्यामुळे त्या स्वत: किंवा त्यांचे पती प्रल्हाद पाटील हे वाघोड खिरवड गटातून रिंगणात उतरण्याची शक्यता. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष (BJP) भाजपचे लालचंद पाटील नशिराबाद- भादली गटातून सदस्य होते आता त्यांचा गट आता भादली- कुसूंबाखुर्द अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना संधी नसल्याने ते आता रिंगणातून बाहेर झाले आहेत. चाळीसगाव येथील भाजपचे पोपट भोळे यांचा वाघळी- पातोंडा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. रावेर (Raver) तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नंदू महाजन यांचा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने तेही आता रिंगणाबाहेर आहे. भिला गोटू सोनवणे यांचे बंधू भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांचा कानळदा भोकर गट आता सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. परंतु त्यांच्या पत्नी या मतदार संघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मधू काटे यांचा गटही राखीव झाल्याने ते सुद्धा रिंगणाच्या बाहेर आहेत.

प्रताप पाटील सुरक्षित

माजी पालकमंत्री व शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील मात्र सुरक्षित झाले आहेत. पाळधी- बांभोरी गटातून ते सदस्य होते. आता त्यांचा गट पाळधी असून तो आता सर्वसाधारण खुला आहे. शिवसेनेतून शिदे गटात गेलेले पवन भिला सोनवणे यांना कुसुंबा खुर्द हा गट अनुसूचित जाती राखीव झाल्यामुळे तेही आता सुरक्षित झाले आहेत, त्यांना लढण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com