अमळनेर (जळगाव) : पतीचा कोरोनात मृत्यू झाला. सात मुलांचा सांभाळ करणे तिला कठीण जात होते. यामुळे आईनेच पोटच्या मुलांना विक्री काढले. पोटच्या मुलांची विक्री करतांना आईला ताब्यात घेतल्याची घटना अमळनेर (Amalner) येथे घडली. (Jalgaon News Amalner Police)
अमळनेरचे (Police) पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलानां विक्री (Crime) करत असल्याचे समजले. अधिक तपासासाठी पो. कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील यांचे पथक सदर महिलेचा शोध घेत तिला गाठले. माहिती घेवून तिचे जवळील ७ मुलांसह पोलीस स्टेशनला हजर केले. यावेळी स्वतः हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) व सोबत ३ मुली, ४ मुले यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
उपजिविकेच्या प्रश्नातून उचलले पाऊल
सदर महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत अधिक विचारपुस करुन चौकशी केली असता सदर मुले व मुली त्या महिलेचे अपत्य असून तिचे पती कोरोना (Corona) काळात कोविड आजाराने मयत झाले. यामुळेच तिच्याकडे स्वतःचे व मुलांच्या उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती मुलांना इच्छुक लोकांना विक्री करत होती. बेकायदेशीरपणे मुलांना विकणे चुकीचे असून महिलेला समज देण्यात आली.
मुलांना बालसुधार गृहात केले दाखल
भविष्यात मुलांना विकुन टाकण्याची शक्यता असल्याने तिच्या ताब्यातील ३ मुली व ४ मुले व तिच्या पालन पोषणकरीता सदर बालकांची काळजी घेण्यासाठी व त्या बालकांना संरक्षण मिळणेकरीता त्यांना बालकल्याण समिती जळगाव येथे हजर करून महिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. सदरची कारवाईवेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउपनि नरसिंग वाघ, पो.कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.