Jalgaon Accident : बसमध्ये चढताना तोल गेला; चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू

Jalgaon News : किनगाव येथे कमलबाई आल्या असता त्या अहमदाबाद येथे आपल्या घरी जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास असल्याने सुरत येथे बसनेच जाण्यासाठी त्या किनगाव बसस्थानकावर आल्या होत्या.
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv
Published On

यावल (जळगाव) : गावी आलेली वृद्ध घरी जाण्यासाठी निघाली असताना बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडली. याच वेळी बस थकल्याने बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचं मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकावर घडली. 

अहमदाबाद येथील असलेल्या कमलबाई रामराव अंडाईत (वय ८१) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. (Jalgaon) किनगाव येथे कमलबाई आल्या असता त्या अहमदाबाद येथे आपल्या घरी जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास असल्याने सुरत येथे बसनेच जाण्यासाठी त्या किनगाव बसस्थानकावर आल्या होत्या. यावेळी (Raver) रावेर आगाराची बऱ्हाणपूर- सुरत ही बस आली असता प्रवाशी चढण्यासाठी गर्दी करू लागले होते. यात कमलबाई देखील होत्या. 

Jalgaon Accident
Amravati Crime : मिटिंग सुरु असताना डोळ्यात मिरची पूड टाकून दीड लाखाची लूट; भर दुपारच्या घटनेने खळबळ

या दरम्यान गर्दीमध्येच बसमध्ये चढत असताना कमलबाई या पडल्या आणि मागील चाकाखाली आल्या. यात त्यांच्या दोघा पायावरून (Accident) बसचे मागील चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात परिवहन मंडळाचे पथक पोलिसांचे पथक किनगावला दाखल झाले. बसचा पंचनामा करण्यात आला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com