Jalgaon news: चिमुकल्यावर कुत्र्याचा प्राणघातक हल्ला, चेहरा अन् मानेचे लचके तोडले; जळगावात हळहळ

Dog Attack: अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Dog Attack
Dog AttackSaam tv
Published On

जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी त्याला रूग्णलयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना जळगावात घडली असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अरविंद सचिन गायकवाड (वय ४ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. अरविंद आपल्या अंगणात खेळत होता. खेळत असताना अचानक पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या पिसाळलेल्या कुत्र्याने अरविंदच्या चेहऱ्यावर, मानेला आणि गळ्याला खोल जखमा करत लचके तोडले.

Dog Attack
Solapur: आजीसोबतचा प्रवास अखेरचा ठरला! दुचाकी चालवणाऱ्या तरूणीनं ६ वर्षीय चिमुकल्याला चिरडलं, सोलापुरात हळहळ

कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात अरविंद रक्तबंबाळ झाला. कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ अरविंदला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ पसरली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी स्थानिक आमदारांना घेराव घालून जाब विचारला तसेच महापालिकेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

Dog Attack
Shocking News: 'माझ्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर..' पतीकडून पत्नीचा छळ, सासरच्या मंडळींकडूनही त्रास

परिसरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात इतर ४ ते ५ जणांनाही चावा घेतल्याचे समजते. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com