Jalgaon Snake: शेवटी आई ती आईच असते! २ महिन्यांच्या बाळाला कोब्रा सापाचा विळखा, क्षणाचाही विचार न करता धावली अन्...

Jalgaon News Today: २ महिन्यांच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा जातीचा नाग विळखा मारून बसलेला होता. हे पाहताच आईने क्षणाचाही विचार न करता...
snake bite
snake biteSaam Tv
Published On

संजय महाजन

Jalgaon Snake News: रात्री अचानक बाळाचा रडायचा आवाज येत होता. त्यामुळे आई झोपेतून उठली. मात्र तिने आपल्या बाळाकडे बघताच तिची झोप उडाली. याचे कारण देखील तसेच होते. २ महिन्यांच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा जातीचा नाग विळखा मारून बसलेला होता. हे पाहताच आईने क्षणाचाही विचार न करता सापाला पकडले आणि बाळाच्या अंगावरून दूर फेकले. त्यामुळे बाळाचा जीव वाचला. मात्र या घटनेत आईला नागाने दंश केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

snake bite
Akola Crime News: धक्कादायक! त्याने तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले; मग व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

ज्योती हिचे सासर बांभोरी, ता. एरंडोल येथील आहे. काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. २ महिन्यांपूर्वी तिला मुलगा झाला. मात्र काही दिवसांपूर्वी भयंकर घटना घडली. संपूर्ण कुटुंब सकाळच्या सुमारास साखर झोपेत होते.

यावेळी घरात ज्योती आणि तिचे २ महिन्यांचे बाळ झोपलेले होते. बाळ अचानक रडायला लागले म्हणून ज्योती झोपेतून जागी झाली. यावेळी तिला आपल्या बाळाच्या अंगावर विळखा घातलेला कोब्रा नाग (Snake) दिसला. ज्योतीने क्षणाचाही विचार न करता या सापाला हातात पकडून दूर फेकले आणि यात तिला नागाने दंश केला. (Jalgaon News)

snake bite
Mumbai Juhu Chaupati: जुहू चौपाटीवर ४ मुलं बुडाली; दोघांचे मृतदेह सापडले, 2 जण अजूनही बेपत्ता

काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी ज्योतीची प्रकृती खालावल्याने तिला तेथून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लस देण्यात आली. अखेर 6 दिवसांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com