Raver Accident : घरी परतताना तरुणाला मृत्यूने गाठले; वाहनाने धडक दिल्याने दुचाकीला अपघात

Jalgaon News : शिवम हा कामासाठी रावेरला आला होता. रात्री काम आटोपल्यानंतर तो पिप्री या गावी असलेल्या घराकडे जाण्यासाठी निघाला
Raver Accident
Raver AccidentSaam tv
Published On

रावेर (जळगाव) : कामानिमित्ताने रावेरला आलेला तरुण रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र घरी पोहचण्यापूर्वीच तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना रावेर तालुक्यात घडली. 

रावेर (Raver) तालुक्यातील पिंप्री येथील शिवम रमेश जाधव (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवम हा कामासाठी रावेरला आला होता. रात्री काम आटोपल्यानंतर तो पिप्री या गावी असलेल्या घराकडे जाण्यासाठी निघाला. रावेरपासून काही अंतरावर गेल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. यात शिवमचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना ३० सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. 

Raver Accident
Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; ११ लाखात फसवणूक

अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून वाहन चालक रात्रीच्या अंधारात पसार झाला. शिवम गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. यावेळी रस्त्याने येणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने घटना उघडकीस आली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला विनोद लालचंद जाधव यांनी फिर्याद दिली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com