Jalgaon Politics: नाथाभाऊनंतर रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं विधान

Raksha Khadse : एकनाथ खडसे यांच्यानंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्यात.
Jalgaon Politics: नाथाभाऊनंतर रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं विधान
Jalgaon Politics raksha khadse saam
Published On

(संजय महाजन)

जळगाव : शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती. आता रोहिणी खडसे यापण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिलीय. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्यात.

काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी आपण भाजमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर रोहिणी खडसेदेखील भाजपात जाणार की शरदचंद्र पवार गटात राहणार, अशी चर्चा सुरू झाल्या होत्या. आता मात्र रक्षा खडसे यांनी केलेल्या दाव्यामुळे रोहिणी खडसे यांचाही भाजपात प्रवेश निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे

आज जरी पक्षाने तिकीट दिलं नाही दिलं तरी मी भारतीय जनता पक्षासोबत आहे, आणि येथेच राहणार. कोणत्याही पक्षात राहिल्यानंतर आपण त्या पक्षाच्या विचारानेच काम करत असतो. आज मी भाजपच्या विचारानेच जोडून मी लोकांपर्यंत पोहचतेय. त्यामुळे साहाजिक आहे, मी भाजपसोबत राहील. भविष्यात जास्तीत जास्त लोकं भाजपशी जोडू. तसेच रोहिणी ताईही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि त्या भाजपमध्ये प्रवेश करतील ,असा दावा रक्षा खडसे यांनी केला होता, त्यांच्या या दाव्याला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मी शरगचंद्र पवार राष्ट्रवादीचा विचार पुढे नेत मी याच पक्षात राहणार असल्याची, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिलीय.

रोहिणी खडसे यांचे प्रत्युत्तर आल्यानंतर रक्षा खडसे यांनी परत प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ खडसे असतील, किंवा मी असेल, किंवा रोहिणी खडसे असतील, आम्ही सर्वजण एकमेंकाच्या व्यक्तिगत मताला प्राधान्य देतो. आज आपण माध्यमात जे ऐकत आहोत, त्यावरूनअसं वाटतं की, त्या भाजपात येण्यास इच्छुक नाहीत. परंतु आम्ही भविष्यात जास्तीत जास्त लोकांना भारतीय जनता पक्षात आणण्याचं काम करू. रोहिणीताई यांचे मत हे वैयक्तिक आहे, त्यांना काय वाटतं हे त्याच सांगू शकतील. पण आम्ही भविष्यात प्रयत्न करू की, जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पक्षात येतील, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

Jalgaon Politics: नाथाभाऊनंतर रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं विधान
Maharashtra Politics: धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com