Bribe case : बिल अदा करण्यासाठी २ लाखाची मागणी; बीडीओसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Jalgaon News : दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ या गावात दरम्यान तक्रारदाराने पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे बिल
Bribe case
Bribe caseSaam tv
Published On

जळगाव : ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचे बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ या गावात दरम्यान तक्रारदाराने पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे बिल तसेच सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे ३ कामे, शासनाच्या ९०-१० हेडखाली ३० लाखांचे तीन अशी एकूण ९० लाखाचे सहा कामे घेतली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे बिल व सावखेडा खुर्द गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६) यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती.

Bribe case
Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत टोकाचे पाऊल; तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८) यांनी तक्रारदाराला २ लाख रुपये लाच रकमेपैकी ५० टक्के प्रमाणे १ लाख रुपये ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना देण्यास प्रोत्साहन देऊन लाच मागणीस समर्थन दिले. तर विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील, वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील यांनी सुद्धा तक्रारदाराकडे स्वतः साठी व गटविकास अधिकारी शिंदे यांचेकडे २ टक्के प्रमाणे २ लाख रुपये लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. दरम्यान तक्रारदाराच्या तक्रारीवरून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com