Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० व १२ फेब्रुवारीला सापळा रचला. मात्र, मुख्याध्यापक मिसर याने लाचेची रक्कम इतर शिक्षकाकडे देण्यास सांगितल्याने कारवाई स्थगित करण्यात आली
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : नोकरी टिकवायची असेल तर दहा हजार रुपयांची जगनी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाला धुळे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत २६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करत एसीबीने मुख्याध्यापकास ताब्यात घेतले आहे. हा प्रकार पारोळा शहरातील एनईएस हायस्कूलमध्ये समोर आला आहे.  


पारोळा (Parola) येथील एनईएस हायस्कूलचा मुख्याध्यापक गौतम बालुप्रसाद मिसर (वय ५३) याच्या भावाची काही दिवसांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान शाळेतील शिपायाला नोकरी टिकवायची असेल, तर दहा हजार रुपये आणून द्यावेत, अशी मागणी गौतम मिसर याने केली. याबाबतर शिपायाने (Dhule ACB) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ९ फेब्रुवारीला तक्रार दिली. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० व १२ फेब्रुवारीला सापळा रचला. मात्र, मुख्याध्यापक मिसर याने लाचेची रक्कम इतर शिक्षकाकडे देण्यास सांगितल्याने कारवाई स्थगित करण्यात आली होती. 

Bribe Case
Vasai Police : मद्यधुंद पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग; नागरिकांनी दिला चोप, पोलीस प्रशासनात खळबळ

मात्र, लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर २६ सप्टेंबरला मुख्याध्यापक मिसर यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकाने केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com