Jalgaon Accident News: भरधाव कारने सायकल चालकाला चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

Parola News : भरधाव कारने सायकल चालकाला चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv

पारोळा (जळगाव) : पारोळा शहरातून गेलेय महामार्गावर धरणगाव चौफुलीजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने सायकलस्वारास जोरदार धडक (Accident) देत चिरडले. यात सायकलवरील युवकाचा (Parola) जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

Jalgaon Accident News
Eknath Khadse News : कायद्यात दुरुस्ती करून ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यावे; खडसेंचा भाजपला सल्ला

पारोळा शहरतील बायपास हायवेवर सदर अपघात झाला. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी शामराव मराठे (वय ३५) हा धरणगाव चौफुलीवर रस्त्या ओलांडून शहराकडे सायकलने जात होते. याचवेळी जळगावच्या दिशेने धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सायकल चालकास जोरदार धडक दिली. यात सायकल चालक शिवाजी हे पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Jalgaon Accident News
Sangli News : आता नेत्यांना नो एंट्री, निवडणुकांवरही बहिष्काराचा निर्णय; मराठा आरक्षणासाठी गावाचा निर्णय

दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी धाव घेतली. यावेळी शहरवासीयांनी धरणगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत गतिरोधक बसवण्याची तसेच विजेची व्यवस्था करण्याची मागणी केली. तर  घटनास्थळी (Police) पोलिसांच्या पथकाने चौफुलीवर जमलेल्या युवकांची समजूत काढत कार चालकावर गुन्हा दाखल करून वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिल्यानंतर  एक तासाने रस्ता मोकळा करण्यात आला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com