जळगाव : मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घ्यायला हवा. राज्यात तुमचं सरकार, केंद्रात तुमचं सरकार आहे. तर ५० टक्केच्या वर (Maratha Aarkshan) आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करून ५० टक्केच्या वरती आरक्षण घोषित करावे; अशी मागणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्र सरकारला केली आहे. (Live Marathi News)
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीमार हा अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठोस भूमिका घ्यायला हवी; असेही एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विशेष अधिवेशनात दुरुस्ती करावी
केंद्रात भाजपच सरकार आहे. राज्यातही त्याचं सरकार आहे. केंद्र सरकारने आता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी; असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावात व्यक्त केलं. लोकसंख्येच्या आधारावर ५० टक्केच्यावर आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय व्हायला हवा. हे प्रकरण अधिक चिघळू न देता सरकारने विशेष अधिवेशनात हा मुद्दा निकाली काढावा; असेही खडसे यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.