Jalgaon: जि.‍ प. निवडणूक चिन्‍हाशिवाय अशक्‍य; फेब्रुवारी-मार्चमध्‍येच नवे पदाधिकारी?

जि.‍ प. निवडणूक चिन्‍हाशिवाय अशक्‍य; फेब्रुवारी-मार्चमध्‍येच नवे पदाधिकारी?
Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam Tv
Published On

जळगाव : राज्यातील ३४ जिल्हा परिषदाच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले, असून, यात जळगाव जिल्‍हा परिषदेसाठी (Jalgaon Zilha Parishad) अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. यामुळे सलग तीन वेळा महिला राखीव राहिल्‍यानंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्यामुळे आता मागच्‍या वेळी उपाध्‍यक्ष, सभापतिपदाची संधी हुकलेल्‍यांच्‍या आशा पल्‍लवित झाल्‍या आहेत. यामुळेच आता गटांचे आरक्षण काय येईल, याकडे लक्ष असून, अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. परंतु, चिन्‍हाशिवाय निवडणूक (Election News) अशक्‍य मानली जात आहे. (Jalgaon Zilha Parishad News)

जिल्‍हा परिषदेचे (Zilha Parishad) अध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने या पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. मुळात १८ वर्षांनंतर (Jalgaon) जळगाव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सर्वसाधारणमधून निवडला जाणार आहे. २००४ मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण निघाल्यानंतर या चुरशीच्या घडामोडींत अशोक कांडेलकर यांना संधी मिळाली होती. आता कोणाला संधी मिळेल हे जिल्‍हा परिषद गटांचे आरक्षण निघाल्‍यानंतरच स्‍पष्‍ट होईल.

Jalgaon ZP
Wardha: महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मदतीची मागणी

फेब्रुवारी-मार्चमध्‍येच नवे पदाधिकारी?

जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ पासून संपुष्टात आला. यानंतर जिल्‍हा परिषदेवर प्रशासक आहे. मागील सहा महिन्‍यांपासून प्रशासक असून, अजून निवडणुकांबाबत हालचाली नाहीत. मुळात जिल्‍हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया झाल्‍याशिवाय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही. वाढीव गटांनुसार काढलेल्‍या आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्चतता आहे. यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्‍येच निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अठरा वर्षांनंतर खुल्या जागेसाठी अध्यक्षपद

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आता महिला, पुरुष, एससी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारण या सर्वच प्रवर्गांतील कुणालाही दावा करता येणार आहे. मागच्‍या १८ वर्षांनंतर हे पद खुले झाल्याने अनेक जण रांगेत असतील. शिवाय मागील तीन टर्ममध्‍ये महिला राखीव असल्‍याने प्रयाग कोळी, उज्ज्‍वला पाटील व रंजना पाटील यांनी अध्‍यक्षपद भूषविले. यामुळे आता संधी मिळेल; सांगता येत नाही.

चिन्‍हाशिवाय निवडणूक अशक्‍य

राज्‍यात शिवसेना व शिंदे गट यांच्‍यात धनुष्‍यबाणाच्‍या चिन्‍हासाठी लढाई सुरू आहे. प्रकरण न्यायालयात असून, याबाबत निकाल येणे बाकी आहे. यामुळे चिन्‍हाचा प्रश्‍न जिल्‍हा परिषदेच्‍या निवडणुकीतदेखील उपस्‍थित होणार आहे. कारण जळगाव जिल्‍ह्यातील शिवसैनिक व शिंदे गटातील पदाधिकारी कोणत्‍या चिन्‍हावर निवडणूक लढवतील, तसेच जिल्‍हा परिषदेतील युती हादेखील प्रश्‍न आहे. यामुळे चिन्‍हाचा निकाल लागल्‍याशिवाय जिल्‍हा परिषदेची निवडणूक लागणे शक्‍य नसल्‍याचेदेखील बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com