Jalgaon News : धावत्या रेल्वेखाली झोकून देत तरुणाने संपविले जीवन; कौटुंबिक कलहातून निर्णय

Jalgaon News : जळगावातील समतानगर परिसरातील दीपक भगवान महाजन (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक महाजन हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. (Jalgaon) हरीविठ्ठल नगरजवळ रेल्वेरूळावर धावत्या रेल्वे खाली सापडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. मात्र या तरुणाने टोकाचा निर्णय कौटुंबिक कलहातून की नैराशेतून केली असा तपास पोलिस करत आहेत. (Latest Marathi News)

Jalgaon News
Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक पडली महागात; डॉक्टरची साडेसात लाखात फसवणूक

जळगावातील समतानगर परिसरातील दीपक भगवान महाजन (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक महाजन हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान ५ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास तो हरीविठ्ठलनगरातील (Railway) रेल्वे रुळावर धावत्या रेल्वे समोर आल्याने गंभीररीत्या जखमी झाला. याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Dhule News : १०० हुन अधिक फटाके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजरखाली; धुळे पोलिसांची कारवाई

परिवाराचा आक्रोश 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मृत दीपक पूर्वी आई- वडील, पत्नी, एक मुलगा, भावासह एकत्र कुटुंबात राहत होता. काही महिन्यांपासून दीपक त्याच्या पत्नी- मुलास घेऊन वेगळा निघाला. तो रामानंदनगर रस्त्यावरील चर्चजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com