बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे डॉ. विजय माहेश्वरी नवे कुलगुरू

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे डॉ. विजय माहेश्वरी नवे कुलगुरू
NMU
NMUSaam tv
Published On

जळगाव : कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभागप्रमुख डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी (Vijay Maheshwarl) यांची कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (NMU) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (jalgaon news Vijay Maheshwarl new vice Chancellor on Bahinabai Chaudhary University)

NMU
Live Marathi News: मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शनिवारी (ता. ५) डॉ. माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. प्रदीप पाटील यांनी ७ मार्च २०२१ ला राजीनामा दिल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) कुलगुरु प्रो. ई. वायुनंदन यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. माहेश्वरी (जन्म ३ जुलै १९६४) यांनी इंदूर (Indore) येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय येथून जैवरसायनशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कार्याचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी जम्मू– काश्मीरचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती महेश मित्तलकुमार यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. खडकपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्रो. वीरेंद्रकुमार तिवारी व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. माहेश्वरी यांच्या निवडीची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com