Live Marathi News: मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून
shankarrao gadakh
shankarrao gadakhSaam TV

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठउकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकांना एकाही मंत्र्याने १०० टक्के हजेरी लावलेली नसून 'दांडीबहाद्दर' मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे शंकरराव गडाख हे आघाडीवर असून त्यानंतर डॉ राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, सुनील केदार, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, हसन मुश्रीफ, डॉ नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांत चढाओढ आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात माझी बदनामी, रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा दावा ठोकणार - पटोले

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) पुणे कमिशनर असतांना माझा नंबर टॅपिंग केला. माझी बदनामी करण्याचे काम केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माझी व्यक्तिगत बदनामी झाली आहे. रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

shankarrao gadakh
फोन टॅपिंग प्रकरणात माझी बदनामी, रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा दावा ठोकणार - पटोले

पुण्यनगरीतील लोकांना माझा नमस्कार, मोदींची मराठीत भाषणाला सुरुवात

- छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यनगरीतील लोकांना माझा नमस्कार. मोदींची मराठीत भाषणाला सुरुवात.

- देश सध्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्यात पुण्याचे योगदान राहिले आहे.

-लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना आदरपूर्वक नमन मोदींनी केलं आहे.

- आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगींची पुण्यतिथी देखील आहे.

- बाबासाहेब पुरंदरेंनाही मोदींनी नमन केले आहे.

- काही वेळापूर्वीच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे.

- आधी भूमीपूजन कधी झालं हे कळत देखील नव्हते. वेळेवर प्रकल्प पूर्णत्वास नेले जाऊ शकतात.

- आज मुळा-मुठेसाठी 1100 कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत आहे.

- आज पुण्याला ई-बसेसही मिळत आहेत.

- पुणेकरांना आज एक सुंदर भेट मिळाली आहे. आर के लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्याला प्राप्त झाली आहे.

- पुणे वासियांचं मी खूप अभिनंदन करतो. मोदींकडून दोन्ही महापौरांचं स्वागत.

- पुणे आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध राहिलं आहे.

- आमचं सरकार पुणेकरांच्या गरज ओखळून काम करत आहे.

- काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल.

- पुणेकरांचं इज ॲाफ लिव्हींग वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. फडणवीस नेहमी याचं काम घेऊन यायचे. मोदींनी मेट्रोचं क्रेडिट फडणवीसांना दिले आहे.

- देशात शहरीकरण किती वेगाने होतंय याच्याशी आपण परिचित आहोत. रस्ते किती मोठे करणार? मास ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा तयार करणं गरजेचं आहे. एक दोन राज्यात मेट्रो सुरु झालेली होती आम्ही महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्क वाढवलं.

- मी पुणेकरांना आणि प्रबुद्ध लोकांना विनंती करतो की आपण कितीही मोठे झाले तरी मेट्रो मध्ये प्रवास करा.

- ग्रीन ट्रान्सपोर्ट असावा ही आमची इच्छा आहे.

- पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनवायला महापालिकेने काम सुरु केलंय. सारखा येणारा पूर थांबावयला आणि नदी स्वच्छतेसाठी हे प्रकल्प महत्वाचे.

बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली, लोकप्रतिनिधींच्या वादात उशिर झाला- अजित पवार

- पंतप्रधानांना एक बाब लक्षात आणून ध्यायची आहेत. महत्त्वाच्या पदावरच्या लोकांकडून चुकीची वक्तव्य केली जात आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसंच छत्रपतींचे विचार पुढे न्यायचे आहेत.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं आणि उपस्थीत मान्यवारांचं पुण्यात स्वागत.

- पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन झालं आहे.

- मेट्रोच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना त्रास झाला म्हणून सहनशिलतेला दाद दिली पाहिजे.

- १० वर्ष मेट्रो रखडली. काही लोकप्रतिनिधींच्या मेट्रो एलिव्हेडेट का अंडरग्राऊंड या मेट्रोच्या वादात उशीर झाला.

- पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली.

- आपल्यामुळे आणि गडकरींमुळे नागपूर मेट्रो वेगाने पुर्ण झाली. इतर प्रकल्पांसाठीही सहकार्य करा. विकासात राजकारण नको, विकासात सगळे एकजुटीने काम करु.

- नदी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण प्रकल्प महत्वाचे आहेत. पर्यावरणाला जैवविविधतेला धक्का न लावता ही कामं करावी लागणार आहेत. त्याकडे लक्ष देऊ.

मेट्रोचं पहिलं तिकीट पंतप्रधानांनी काढलं, आम्ही विदाऊट तिकीट- फडणवीस

- देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन भाषणाला सुरुवात केली आहे. मेट्रोचं पहिलं तिकीट पंतप्रधानांनी काढलं. आम्ही विदाऊट तिकीट होतो आम्हीही तिकीटाचे पैसे देऊ. अनेक अडचणी असताना मेट्रोचं काम सुरु झालं. विक्रमी वेळात मेट्रोचं काम पूर्ण झाल्याचा आनंद होतो. पुण्यातील नद्या आता स्वच्छ होणार आहेत.

PM मोदींचे पुण्यनगरीत स्वागत- मोहोळ

- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय की, आज PM मोदी पुण्यनगरी पुण्यात आले आहेत. त्यांचं स्वागत करतो. मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पुणेकरांचे आभार मानतो. पुणे शहर वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराजांची पुण्यभूमी पुणे आहे. शिवाजी महाराजांची आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची पुण्यभूमी पुणे आहे. टिळक आणि सावरकरांची कर्मभूमी पुणे आहे.

- प्रत्येक पुणेकरासाठी हा आनंदाचा दिवस आहे. मेट्रोचं स्वप्न आज खरं उतरलं. मेट्रोचा शुभारंभ आणि त्याचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते हा आनंदाचा क्षण आहे. 60 वर्षांनी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान पुणे महापालिकेत येऊ शकले हे भाग्य आहे. गंगेनंतर मुळा आणि मुठाच्या योजनेचा शुभारंभ होतो आहे.

मुरलीधर मोहोळ, अजित पवारांकडून मोदींचं स्वागत...

- महापौर मुरलीधर मोहोळांकडून मोदींचे स्वागत.

- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मोदींच्या दौऱ्यात आत्ता सहभागी झालेत.

- फडणवीस आधीपासून सोबत आहेत.

- अजित पवारांकडून अंबाबाईची मुर्ती देऊन पंतप्रधानांचा सत्कार.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन

- पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकास कामांच उद्घाटन करण्यात आले आहे.

- नदी सुधार प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

- तसेच महापालिकांच्या विविध कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे.

- मोदींच्या हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान मोदींचा मेट्रो प्रवासादरम्यान दिव्यांगांशी संवाद

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा कंदील दाखवला.

- नंतर मोदींनी मेट्रोमध्ये प्रवास केला.

- मेट्रो प्रवासादरम्यान मोदींना काही शालेय विद्यार्थी, दिव्यांग यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन 

- पुणे मेट्रोच्या गरवारे स्थानकाचे अनावरण संपन्न

- नरेंद्र मोदी, भगतसिंग कोश्यारी, अजीत पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थीत.

- पुणे मेट्रोचा ५ किमीचा टप्पा पुर्ण झाला आहे.

- आज दुपारपासूनच पुणेकरांसाठी मेट्रो खुली होणार आहे.

तो वादग्रस्त फेटा अखेर महापौरांनी मोदींना घातला!

- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वादग्रस्त ठरलेला फेटा घालून पंतप्रधानांचे स्वागत केले आहे.

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुताळ्याचे अनावरण मोदींच्या हस्ते झाले आहे.

- आता मोदी गरवारे महाविद्यालयाला मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं केलं अनावरण

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं केलं अनावरण. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुभाष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित

नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन

नरेंद्र मोदी आज करणार मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण

गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनचं उद्घाटन

गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर करणार मेट्रो प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेट्यावरील राजमुद्रा हटवली

(विश्वभुषण लिमये)

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या राजमुद्रेवरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी या फेट्यावरून राजमुद्रा हटवून त्यावर सूर्यफूल लावण्यात आले आहे. यावरून राजकारण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे मुरुडकर फेटेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अलका चौकात काँग्रेसचं आंदोलन...

(विश्वभूषण लिमये)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मेट्रोचं उदघाटन करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत.

मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला काँग्रेसने विरोध करत आहे.

पुण्यातील अलका चौकात काँग्रेस कडून नरेंद्र मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या जातायत,

कांही आक्रमक आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात ही घेण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

(अश्विनी जाधव केदारी)

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन करत असल्याची टिका राष्ट्रवादीने केलीय केली. या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही प्रमुख  पदाधिकारी  ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी आणि महापुरुषांची भजने गात मूक आंदोलन करणार आहेत

पुणेकरांनी शहरभर लावले खोचक टोमणे मारणारे बॅनर

(विश्वभूषण लिमये)

मोदींच पुण्यात अनोख्या पद्धतीने स्वागत

शहरभर लावले खोचक टोमणे मारणारे बॅनर

उपहासात्मक टोमणे मारून पुणेकर करतायत पंतप्रधानांच स्वागत..

शहरातील मार्केट यार्ड, पर्वत भागात राष्ट्रवादी काँग्रेस कडून लावण्यात आले छोटे छोटे बॅनर

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; असा असेल संपूर्ण दौरा

(प्राची कुलकर्णी)

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच बरोबर नदीसुधार प्रकल्पाचीही सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. साधारण सकाळी १० च्या सुमारास मोदींचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील. त्यानंतर गरवारे इथं मेट्रोचं उद्घाटन करतील. तिथून ते मेट्रोने प्रवास करतील. त्यानंतर एमआयटी जवळ भाजप कडून सभा होणार आहे. त्यानंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन करुन सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com