जळगाव : सुरवातीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठविले. व्हिडिओ कॉल करून वृद्धास कपडे काढायला लावले. नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून दहा हजारांची खंडणी उकळली. (jalgaon news video threatened to go viral The woman robbed the old man)
भुसावळ (Bhusawal) शहरातील ५७ वर्षीय सुभाष पांडुरंग लोखंडे यांना सेामवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास एका महिलेच्या अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर ‘हाय’ असा संदेश आला. त्यानंतर तक्रारदारासोबत चॅटिंगच्या माध्यमातून बोलणे सुरू झाले. जवळीक साधून व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल करून तिने स्वत:च्या अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडिओ पाठविले.
अंगावरील कपडे काढाया सांगून केले चित्रीकरण
त्यानंतर ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’, असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादीनेही अंगावरील कपडे काढून चित्रीकरण केले. समोरील महिलेने लागलीच फिर्यादीचे कपडे काढलेला व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर फिर्यादीला रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत दहा हजार ५८० रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने घाबरून महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले. याबाबत जळगाव (Jalgaon) सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात दोन मोबाइलधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.