जळगावात उष्माघाताचा बळी; भर उन्हात शेतात काम

Sun stroke
Sun strokeSaam tv
Published On

जळगाव : वाढलेल्या तापमानाचा फटका असह्य होत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तापमान 41 अंशाच्या वर गेले असून उन्हाचा फटका बसल्याने एकाचा बळी गेला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon news Victim of heatstroke in amalner taluka)

गेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची लाट आली असून नंदुरबारचा पारा ४२ तर जळगाव आणि धुळ्याचा पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत भिडला आहे. दरम्यान, उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली असून बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांच्या पार गेला आहे. लाहीलाही करणारा हा उष्णतेचा कहर २ एप्रिलपर्यंत कायम राहील असे सांगितले आहे.

भर उन्हात शेतात काम

मांडळ (अमळनेर) येथील जितेंद्र संजय माळी याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. जितेंद्र हा उष्माघाताचा पहिला बळी ठरला. त्याने भर उन्हात दिवसभर शेतात काम केले. संध्याकाळी त्याला शेतातच चक्कर आली. चुलत भाऊ महेंद्र व मजुरांनी त्याला खासगी डॉक्टरांकडे दाखल केले. प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला नेत असताना तो बेशुद्ध पडला; यातच त्याचा मृत्यु झाला. ग्रामीण रुग्णालयात त्याला मृत घोषित केले. त्याला उष्माघात सदृश्य लक्षणे होती व मेंदूत रक्तस्राव झाला असल्याचे डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com