श्रावण सोमवार : नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्रावण सोमवार ः अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
श्रावण सोमवार
श्रावण सोमवार
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जुने हेमाडपंती मंदिर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नागेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्‍याने नागेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मंदिरात गर्दी केली. (jalgaon-news-varangaon-Crowd-of-devotees-for-darshan-at-Nageshwar-temple)

नागेश्वर महादेव मंदिर चारशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून नागेश्वराच्‍या मंदिराकडे पाहिले जाते. या पुरातन मंदिर व परिसराचा कायापालट होत असून ते भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी याठिकाणी येऊन भक्त महादेवाचे दर्शन घेत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

गतवर्षी मंदिर होते बंद

कोरोना व्‍हायरसच्‍या प्रादुर्भावामुळे गतवर्षी श्रावण महिन्यात नागेश्‍वर मंदिर बंद होते. परंतु, यावर्षी प्रशासनातर्फे सुट दिली असल्‍याल्यामुळे आज भाविकांच्या दर्शनासाठी नागेश्वर मंदिर खुले करण्यात आले. येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे.

श्रावण सोमवार
कृषिकन्‍येची निसर्गाच्‍या बदलावर मात; सेंद्रीय शेतीतून वर्षासाठी पंधरा लाखाचे उत्‍पन्‍न

मंदिराची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

इंदूरच्या होळकर राजांच्या व ग्वाल्हेरच्या शिंदे राजांच्या पुरातन नोंदी संस्थेकडे आहेत. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सन १९७९ मध्ये ट्रस्ट तयार केली आहे. त्‍यावेळपासून मंदिराची सुधारणा करून परिसर निसर्गरम्य करण्यात आले. श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे त्रयोदश कल्केश्वर ज्योर्तिलिंग मंदिरसुद्धा आहे. या मंदिराचे मुख्यद्वार पूर्व दिशेला आहे. गाभाऱ्यासमोर शिव-पार्वतीची मूर्ती असून गाभाऱ्याच्या द्वाराजवळ गणपती व हनुमानाची मूर्ती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com