Jalgaon Accident News: दुचाकीवरून ट्रीपलसीट प्रवास अंगाशी; विचित्र अपघातात पुरोहितासह माय-लेकीचा मृत्यू

दुचाकीवरून ट्रीपलसीट प्रवास अंगाशी; विचित्र अपघातात पुरोहितासह माय-लेकीचा मृत्यू
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv
Published On

जळगाव : तालुक्यातील कानळदा गावाजवळील शाळेजवळ झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दुचाकीस्वार पुरोहितासह (Jalgaon News) अनोळखी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच दुचाकीवर ट्रिपलसीट असलेली महिला अत्यवस्थ असून रिक्षातील चालक व चार महिला प्रवासी जखमी झालेत. ही घटना सोमवारी (२६ जून) घडली. (Tajya Batmya)

Jalgaon Accident News
Nashik Accident News: दुचाकी - बसचा भीषण अपघात! ३ शिवसैनिकांचा जागीच मृत्यू

दुचाकीस्वार डिगंबर ऊर्फ महेश गोकूळ जोशी या पुरोहिताची ओळख पटली असून रात्री आठ वाजेपर्यंत मृत तरुणीची ओळख पटविण्याचे काम तालुका पोलिस करत होते. जखमींना खासगी व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Jalgaon Accident News
Eknath Khadse News: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी करणार आंदोलन

पिंप्री (ता. धरणगाव) येथील डिगंबर ऊर्फ महेश गोकूळ जोशी हे त्यांच्या दुचाकीने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय तरुणी बसले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असताना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारला. या अपघातात दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणाऱ्या रिक्षेने रोडवरील तिघांना चिरडले. यात रिक्षा देखील उलटली. रिक्षातील प्रवासी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनीता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षाचालक रवींद्र भावलाल पाटील (सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव) हे जखमी झाले.

Jalgaon Accident News
Eknath Khadse Statement: मुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अधिकारींवर दबाव; एकनाथ खडसेंचा आरोप

खासगी वाहनातून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीस्वार महेश जोशी आणि अनोळखी महिला यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस (Police) ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com