म्‍हणूनच खानदेश राहतोय तहानलेला; वर्षानुवर्षाचा प्रश्‍न सुटेना

म्‍हणूनच खानदेश राहतोय तहानलेला; वर्षानुवर्षाचा प्रश्‍न सुटेना
Tapi Hatnur dam
Tapi Hatnur dam
Published On

जळगाव : खानदेशातील तापी नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्‍न असून देखील अद्याप सुटलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीचे सुमारे २०० ते ३०० टीएमसी पाणी गुजरात राज्यातील उकई धरणात जावून थांबते. याचा विचार अजून देखील होत नसल्‍याचे चित्र आहे. (jalgaon-news-tapi-river-water-flow-every-year-ukai-dam-gujrat)

गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून तापी नदी वाहते. तापी नदीच्या पाण्याच्या वाटपाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे २०० टीएमसीपेक्षा जास्त पाणी येते. पाणी अडवण्यासंदर्भात आराखडे तयार आहेत. मात्र, यावर उपाययोजना होत नसून मिळालेला निधी देखील इतरत्र वापरला जात असल्‍याचे अनेकदा बोलले जात आहे. तापी नदीच्या २०० टीएमसी पाण्यावर राज्याचा हक्क आहे. मात्र, राजकिय नेते व प्रशासनाच्‍या दुर्लक्षामुळे हक्काच्या पाण्याचा फायदा गुजरातला होत आहे.

म्‍हणूनच खानदेश तहानलेला

मध्यप्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी ही खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी गंगा समजली जाते. तापीचा उगम मध्यप्रदेशातून झाला असला तरी तिचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मध्यप्रदेश, विदर्भासह पूर्णा नदीच्या पुरामुळे तापी नदी दुथडी भरून वाहते. परंतु, तापी नदीवर मोठे सिंचन प्रकल्प नसल्याने हे पाणी गुजरातच्या दिशेने वाहून जात उकई सिंचन प्रकल्पातून थेट समुद्रात जाऊन मिळते. वर्षानुवर्षे हे चक्र सुरू आहे. सिंचन प्रकल्प नसल्याने खानदेश आजही तहानलेलाच आहे.

Tapi Hatnur dam
सुरत– नागपूर महामार्गावर गॅसचा टँकर लिकेज

दोन प्रकल्पही अपूर्णच

तापी नदीवर १७ टीएमसी क्षमता असलेले जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा व प्रकाशा हे ४ सिंचन प्रकल्प पूर्णावस्थेत आहेत. पहिल्याच पुरात हे भरत असल्याने त्यातून पाणी सोडून द्यावे लागते. सोडून देण्यात आलेले पाणी दरवर्षी सुमारे २०० ते ३०० टीएमसी एवढे असते. तापी नदीवर उभारण्यात येणारे जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज आणि अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प म्हणजेच पाडळसरे प्रकल्पाचे काम अतिशय संथ सुरू आहे. दोन्ही प्रकल्प पूर्ण झाले नसल्याने त्यांची किंमत आज हजारो कोटी रुपयांनी फुगली आहे. यामुळे राज्य व केंद्र सरकारला आर्थिक झळ तर सोसावी लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com