Silver Price: सहा दिवसात चांदी अडीच हजाराने वाढली

सहा दिवसात चांदी अडीच हजाराने वाढली
Silver
SilverSaam tv
Published On

जळगाव : सतत चढउतार होत असलेल्‍या चांदीच्‍या दरात पुन्‍हा वाढ झाल्‍याचे पहावयास मिळाले आहे. सण उत्‍सवाचे दिवस सुरू झाल्‍याने आता (Gold) सोने– चांदीला मागणी असते. यामुळे भाव वाढीची शक्‍यता अधिक असते. यात (Silver) चांदीच्‍या दर वाढून पुन्‍हा ५५ हजारांवर पोहचले आहेत. (Jalgaon News Silver Price)

Silver
मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरूणाचे अपहरण; आठ दिवसांपासून बेपत्ता

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच घसरण (Jalgaon) झालेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. सहा दिवसांत चांदी दोन हजार ८०० रुपयांनी वधारले आहेत. मागील आठवड्यात ५२ हजार २०० वरून ५५ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात मात्र किरकोळ चढ उतार सुरूच असून मंगळवारच्या तुलनेत सोन्याचे दर २५० रुपयांची घसरण होऊन ते बुधवारी ५१ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चांदी ५५ हजार ४०० रुपयांवर होती. त्यानंतर भाव कमी होत जाऊन १ सप्टेंबरला ५२ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी झाल्याने ऐन गणेशोत्सवात चांदीमध्ये घसरण झाली होती. त्यानंतर, मात्र यात पुन्हा वाढ सुरू झाली. त्यानुसार, ती ६ सप्टेंबरला ५४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यात ७ सप्टेंबरला पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ५५ रुपये प्रति तोळ्यावर हजार पोहोचली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com