कोरोना लस न घेतल्यास दुकाने होणार सील; १५ ऑक्टोबरनंतर शोध मोहीम

कोरोना लस न घेतल्यास दुकाने होणार सील; १५ ऑक्टोबरनंतर शोध मोहीम
corona Vaccination
corona Vaccination
Published On

जळगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’अंतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात सुरवात झाली आहे. १४ ऑक्टोंबरपर्यत दुकानदार, त्यातील कर्मचारी, व्यापारी, संस्था, आस्थापनांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा पंधरा ऑक्टोबरपासून महापालिका, नगरपालिका हे पोलिसांच्या मदतीने लसीकरण शोध मोहीम राबविणार आहे. त्यात जर दुकानदारांनी, कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नसेल तर दुकान सील करणे, दंड करणे, त्या दुकानाचा परवाना रद्द करणे अशा कारवाया होणार आहेत. (jalgaon-news-Shops-sealed-if-the-corona-is-not-vaccinated-Search-operation-after-October)

जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी सांगितले, तिसऱ्या लाटेचा प्रभाव टाळण्यासाठी जिल्ह्यात मिशन कवच कुंडल अशी विशेष लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत जळगाव महानगरपालिका क्षेत्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक वार्ड, प्रभागनिहाय लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्र निश्‍चित करुन शिल्लक राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस लवकरात लवकर द्यावयाचा आहे. नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रत्येक वॉर्ड, प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावयाची आहेत. कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या साहाय्याने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आहे. संबंधित गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक गावनिहाय स्वतंत्ररीत्या नियोजन करावे, अशा सूचना आहे.

corona Vaccination
जिल्हा बँकेत जागा वाटप निश्चित; भाजप व महाविकास आघाडीला इतक्‍या जागा

सर्वांचे लसीकरण अन्यथा कारवाई

या मोहिमेत सर्व दुकाने, फळ विक्रेते, भाजीपाला, विक्रेते, खाजगी आस्थापना, तत्सम प्रकारची दुकाने, आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, कामगार, मालक चालकांनी कामगार, चालक, मालकांचे लसीकरण करून घ्यावे. १५ ऑक्टोबरनंतर ज्या दुकाने, आस्थापनांमधील कामगार, चालक, मालक यांनी लसीकरण करून घेतले नसल्याचे देखील आढळून आल्यास असे दुकाने, आस्थापनांवर पोलिस विभाग व स्थानक स्वराज्य संस्था यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई संयुक्तरीत्या करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com