शरद पवारांच्‍या मुखात राम व बगलेत सुरी; सदाभाऊ खोत यांचा निशाणा

शरद पवारांच्‍या मुखात राम व बगलेत सुरी; सदाभाऊ खोत यांचा निशाणा
सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

जळगाव : उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जळगावात शरद पवारांवर टीका केली. (jalgaon-news-sadabhau-khot-press-and-ncp-leader-sharad-pawar-target)

पंचायत राज समितीच्या दौऱ्यानिमित्ताने सदाभाऊ खोत जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्‍यावर निशाणा साधला. खोत म्‍हणाले, की शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर, साखर सम्राट व कारखानदारांचे नेते आहेत. शेतकऱ्यांचा खजिना कसा लुटायचा यात शरद पवार हे तरबेज आहेत. शुगर केन कंट्रोल कायदा १९६६ प्रमाणे शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास घातल्यानंतर त्याच्या रिकवरी नुसार शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून एकरक्कमी एफआरपी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, ती टप्प्यात गरजेचे असल्याचे सांगून ६०; २०; २० असे तीन टप्पे करण्यात आले. आणि हे सर्व केंद्र सरकारने ठरवले असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्‍याचे ते म्‍हणाले.

सदाभाऊ खोत
नंदुरबारमध्‍ये अतिवृष्‍टी..सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधून विसर्ग

अन्‍यथा एफआयआर दाखल

पवारांची चाल केंद्राच्या लक्षात आली नाही. मात्र, आम्ही आता शरद पवार यांचा हा शेतकरी विरोधी आणि कारखानदारांच्या हिताचा डाव उधळून लावणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना एक ऊसाची एक रक्कमी एफआरपी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ही एफआरपी चुकती करावी, त्यानंतर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा. अन्यथा त्यांच्यावर एफआयआर दाखल करून साखर जप्त करून त्याचा लिलाव करून त्यातून शेतकऱ्यांना रक्कम द्यावी अशी मागणी करणार असल्‍याचे खोत यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com