नंदुरबारमध्‍ये अतिवृष्‍टी..सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधून विसर्ग

नंदुरबारमध्‍ये अतिवृष्‍टी..सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधून विसर्ग
सारंगखेडा
सारंगखेडा
Published On

नंदुरबार : राज्‍यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, नंदुरबार जिल्‍ह्यातील शहादा परिसरात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. तापी नदीला महापूर आल्‍याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. (nandurbar-district-heavy-rain-droped-sarangkheda-and-prakasha-barrage-door-open)

उत्तर मध्य महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हतनूर आणि वाघूर धरणातुन १ लाख ४९ हजार ११० क्युसेक व सुलवाडे बॅरेजचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येवून २ लाख ३२ हजार ७०१ क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सारंगखेडा
घरावर आदळला भलामोठा दगड; नंदुरबारमधील रात्रीची घटना

विसर्ग आणखी वाढणार

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे १२ दरवाजे पूर्णपणे उघडून २ लाख २१ हजार ६६४ क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १७ दरवाजे पूर्णपणे उघडून २ लाख ३६ हजार ९३ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. पुढील ४८ ते ७२ तासात सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याने तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com