कामावर येण्याचा अल्टिमेटम धुडकावला; पण जळगावातील ८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

कामावर येण्याचा अल्टिमेटम धुडकावला; पण जळगावातील ८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती
st strike
st strike

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा गेल्‍या महिनाभरापासून संप सुरू आहे. कर्मचारी आपल्‍या मागणीवर ठाम असून, जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात एकही नवीन एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. कर्मचारी संपावर ठाम असून, आंदोलनाला बसले आहेत. यादरम्‍यान विभागातून ८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्‍ती करण्यात आली. (jalgaon-news-Rejected-the-ultimatum-to-come-work-termination-of-service-of-84-st-employees)

एसटीच्या शासन सेवेत विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत; परंतु राज्‍य शासन व प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. तरीदेखील कर्मचारी संपावरून मागे हटत नाहीत. यातच संपकाळात निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी सोमवार (ता. १३)पर्यंत रुजू झाल्यास निलंबन मागे घेण्याची घोषणा परिवहनमंत्री परब यांनी केली होती. मात्र, याला जळगाव जिल्‍ह्यातील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न देता संपावर ठाम राहिले.

st strike
वाढदिवस प्रेमी युगलाच्या अंगलट! जमावाची जोडप्याला बेदम मारहाण

८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्‍ती

पगारवाढीचा निर्णय मान्‍य नसल्‍याचे सांगत कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने शासनाच्या आदेशानुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात येत आहे. यात कामावर रुजू होत नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदलीची कारवाई केली. अखेरची संधी दिल्यानंतरही कामावर न आलेल्‍या कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्‍तीचे आदेश होते. त्‍यानुसार जळगाव विभागातून एकूण ८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्तीची कारवाई केली गेली. सेवासमाप्‍तीनंतरदेखील कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत अन्‍य कर्मचाऱ्यांनी त्‍यांना आनंदाने निरोप देत अनोखे आंदोलन केले.

चौदा कर्मचारी रुजू

जळगाव जिल्ह्यात एकूण चार हजार ४४२ कर्मचारी संपावर आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने जिल्‍ह्यातील ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यामुळे काही अंशी बससेवा सुरू झाली होती. मात्र, यानंतर सेवा पुन्‍हा विस्‍कळित झाली. आज काही कर्मचारी रुजू होऊन सेवा सुरू होणे अपेक्षित होते. त्‍यानुसार विभागातून १४ कर्मचारी रुजू झाले आहेत.

दिवसभरात १९ बसफेऱ्या

जळगाव विभागात सोमवारी नव्‍याने १४ कर्मचारी कामावर रुजू झाले. यामुळे काही बसफेऱ्या झाल्‍या. जळगाव विभागातून दिवसभरात सहा शिवशाही व १३ साध्‍या बसच्‍या फेऱ्या झाल्‍या. यातून २२४ प्रवाशांनी प्रवास केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com