Lightning Strike : वीज पडून तरुणाचा मृत्यू; रावेर तालुक्यातील घटना

Jalgaon Raver News : रावेर तालुक्यात २८ ऑगस्टला सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. रात्री सुमारे आठच्या सुमारास रावेर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरूवात झाली
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात वीज पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे घडली. तर सोबत असलेल्या मित्र विजेच्या आवाजामुळे काहीवेळ बेशुद्ध पडले होते. मात्र या घटनेने मृत तरुणाचा परिवारावर मोठे संकट उभे राहिले असून परिवारातील कमावता व्यक्ती गेला आहे. 

रावेर तालुक्यातील मुंजलवाडीतील चुनाबर्डी भागातील दादा सोमा कोळपे (वय २३) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात रोज जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. यातच रावेर तालुक्यात २८ ऑगस्टला सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. रात्री सुमारे आठच्या सुमारास रावेर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरूवात झाली.

Lightning Strike
Nanded : कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात बुडाला; नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना अश्रू अनावर

दोघेजण जखमी 

याच दरम्यान दादा कोळपे हा आपल्या कुटुंबासह पाड्यावर थांबला होता. तर त्याचे मित्र देखील यावेळी होते. याचवेळी अचानक विज पडल्याने ते जागेवरच कोसळले. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Lightning Strike
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टी; मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

कुटूंबाचा आधार गेला 

घटनेनंतर कोळपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादा कोळपेची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून, त्याच्या मागे पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बाळा आमोदकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या टीमने मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मात्र कुटुंबावर शोककळा पसरली असून घटनेमुळे कुटुंबाचा कमावता आधार गेला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com