रावेर (जळगाव) : विवरा खुर्द (ता. रावेर) येथे शेतात विहिरीवर वीज पडून शेतमजूर महिला जागीच ठार ठार झाली. सदर घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. यात तीन जण बचावले आहेत. (Jalgaon-news-raver-taluka-women-death-thunder-strome)
विवरे खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय ३५) ही महिला शेजारच्या विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली. यावेळी शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी (वय ९), मुलगा राहुल (वय ७) आणि मुलगी रवीना (वय ३) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे.
तत्काळ रुग्णालयात आणले
वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.