पारोळा (जळगाव) : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांची हाताची बोटे कापली गेली, तसेच डोक्यास देखील जखम झाली. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला संतापजनक असून याचा पारोळा पालिकेत कामबंद आंदोलन करत निषेध करण्यात आला. (jalgaon-news-Protest-by-Parola-Municipality-over-Thane-incident-Complete-shutdown)
पारोळा नगरपरिषदेचे संपूर्ण कामकाज कडकडीत बंद करण्यात आले. तसेच हल्लेखोरास कडक कारवाईची मागणी पालिकेकडुन करण्यात आली. यावेळी पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाने यात सहभागी नोंदवुन निषेध नोंदविला. दरम्यान अग्निशामक सेवा वगळता पालिकेचे सर्व कामकाज बंद होते.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात. तेंव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे; तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.
तिव्र शब्दात निषेध
एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती- पत्नी एकत्रीकरणाला नविन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मुळे सामाजिक आरोग्यास सुद्धा क्षती पोहचत आहे. अशा समाज विघातक कृतीमुळे फक्त अधिकारीच नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे या गुन्हेगारी कृत्त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. यावेळी यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, पोनि संतोष भंडारे यांना कार्यालयीन अधिक्षक संघामित्रा संदानशिव, पाणी पुरवठा अभियंता पंकज महाजन, नगर रचना सहाय्यक योगेश तलवारे, अभियंता अभिषेक काकडे, संगणक अभियंता कुणाल सौपुरे, चंद्रकांत महाजन, भूषण महाजन, टी. डी. नरवाळे इत्यादी सर्व पारोळा नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.