चाळीसगाव पालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार

चाळीसगाव पालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार
Chalisgaon Palika
Chalisgaon Palikasaam tv
Published On

चाळीसगाव (जळगाव) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुका होणाऱ्या नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, यंदाही एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार शहरात एक प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या आता ३४ वरून ३६ होऊ शकते. (jalgaon news number of corporators will increase in Chalisgaon municipality)

Chalisgaon Palika
साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमधून रुग्ण माघारी; अपुरे डॉक्टर असल्याने गैरसोय

चाळीसगाव (Chalisgaon) पालिकेच्या अंतिम प्रभागरचनेला १ एप्रिलला मान्यता मिळणार असून, ५ एप्रिलला अंतिम रचना जाहीर होईल. त्यानंतर प्रभागांसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. सध्या रस्त्यासह इतर विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर काही विद्यमान नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जवळपास सर्वच प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक (Palika Election) लढविण्यासाठी अनेकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे पालिकेची यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

चाळीसगाव नगरपालिका (Chalisgaon Palika) ‘ब’ वर्गात असून, २७ नोव्हेंबर २०१६ ला पालिकेची निवडणूक झाली होती. तर २९ डिसेंबर २०२१ ला पालिकेची मुदत संपली. आता निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागवणे व त्यावर सुनावणी घेणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रारूप रचनेबाबत रहिवाशांच्या हरकती, सूचना मागविण्यासाठी १० ते १७ मार्चचा कालावधी राहणार आहे. त्यावर २२ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. त्यानंतर २५ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाईल. १ एप्रिलला राज्य निवडणूक आयुक्त अंतिम प्रभागरचनेला मान्यता देतील. ५ एप्रिलला अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी जाहीर करतील. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल. एकूणच या सर्व प्रक्रियेचा कालावधी पाहता, मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या पाहता, यावेळी दोन नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com