साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमधून रुग्ण माघारी; अपुरे डॉक्टर असल्याने गैरसोय

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमधून रुग्ण माघारी; अपुरे डॉक्टर असल्याने गैरसोय
Shirdi Hospital
Shirdi Hospitalsaam tv
Published On

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत राज्यात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. एकेकाळी गोरगरीब रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरलेल्या साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारक परिचारिका पुरेसे नाहीत. यामुळे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयालमध्ये (Hospital) बाहेरून आलेल्या रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. (shirdi news Patient return from Saibaba Super Specialty Hospitals)

Shirdi Hospital
Nandurbar: मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे निदर्शने

एकेकाळी तज्ञ आणि नामांकित डॉक्टरांमुळे साईबाबा (Saibaba) सुपरस्पेशालिटी नावारूपाला आले होते. मात्र आता बाहेरून आलेल्या रुग्णांना अल्प डॉक्टरांच्या (Doctor) संख्येमुळे उपचार मिळत नसल्याचे समोर आले आहे. राज्यातून येणाऱ्या रुग्णांना पुन्हा माघारी जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सध्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णांसाठी जीवघेणे ठरत आहे.

रुग्णांना जावे लागतेय माघारी

अपुरी वैद्यकीय व्यवस्था असल्याने केवळ स्टाफ नर्स आणि ब्रदर्स यांच्या भरोशावरच कारभार सुरू आहे. तज्ञ डॉक्टरांची (Shirdi News) कमी असल्याने मोठ्या आशेने आलेल्या रुग्णांना नाईलाजास्तव परत फिरण्याची वेळ येत आहे. सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही. किडनी विकारतज्ञ, बालरोगतज्ञ यासह अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांची गरज असतांना डॉक्टर उपलब्ध होत नाही. साईदरबारी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com