जळगावात डांबरी रस्‍तेच नाही फक्‍त चिखल; महापालिकेतील सत्‍तांतर ठरतेय निरूपयोगी

जळगावात डांबरी रस्‍तेच नाही फक्‍त चिखल; महापालिकेतील सत्‍तांतर ठरतेय निरूपयोगी
jalgaon corporation
jalgaon corporation
Published On

जळगाव : जळगाव महापालिकेत सप्टेंबर २०१८ मध्ये महापालिका निवडणूक होऊन भाजपची सत्ता आली. सत्तांतरामुळे मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जळगाव शहर खड्ड्यातच राहिले. अडीच वर्षे भाजपच्या कारभारावर टीका करणाऱ्या शिवसेनेने गेल्या मार्चमध्ये चमत्कार घडवून सत्ता काबीज केली. त्यालाही पाच महिने झाले, पण आजही शहर खड्ड्यातच आहे. उलट शहराची आणखीच दुरवस्था झालीय. आता तर शहरातील डांबरी रस्‍तेच गायब झाल्‍याचा अनुभव येत आहे. अर्था दोन्ही वेळी झालेला सत्ताबदल जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरत आहे. (jalgaon-news-no-asphalt-road-city-Independence-in-the-Municipal-Corporation-is-useless)

शहरात रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असताना शहरातील रस्ते, त्यातील खड्डे, अमृत योजनेच्या रखडलेल्या कामामुळे ठिकठिकाणच्या चाऱ्या, त्यात साचलेले पाणी या भयानक परिस्थितीमुळे जळगावकरांना मनस्‍ताप होत आहे.

पावसाने दुरवस्था उघड

जळगाव शहरात रिमझिम पावसाची संततधारेने सुरू असताना रस्‍त्‍यांची दुरावस्‍था उघड होते. पाऊस नसतानाही रस्त्यांची दुरवस्था हे चित्र जळगावकरांना नवीन नाही. मात्र, पावसामुळे रस्त्यांची प्रचंड बिकट अवस्था झाली असून, त्यामुळे वाहनधारक, पादचारी सर्वच त्रस्त आहेत.

jalgaon corporation
नंदुरबारच्‍या शिवसेना नेता व समितीकडून पुरग्रस्‍तांना दिले इतके लाख

सर्वदूर खड्डे अन्‌ चिखलच

शहरात तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनी व भुयारी गटारांचे काम सुरू आहे. जलवाहिन्यांसाठी रस्त्याच्या एका बाजूने, भुयारी गटार योजनेसाठी रस्त्याच्या मधोमध चाऱ्या खोदल्या जात आहेत. खोदलेल्या चाऱ्या, खड्डे व्यवस्थित बुजविलेही नाहीत. ज्या ठिकाणी पॅचवर्क झाले, तेथील खडी उखडून गेली. ज्याठिकाणी पॅचवर्कच झाले नाही, तेथे माती-मुरूम रस्त्यावर येऊन चिखल झाला. नळसंयोजनासाठी दिलेले खड्डे कसेबसे बुजविल्याने पावसामुळे ते उघडे पडले.

जळगावकर चिखलाचे साक्षीदार

अमृत योजनेच्या रखडलेल्या कामामुळे नरक यातना भोगणाऱ्या जळगावकरांना पावसामुळे झालेल्या चिखलाचे साक्षीदार व्हावे लागत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर चिखलाने रांगोळ्या साकारल्या आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यात पडून, चिखलात घसरून वाहनांचे अपघात होत असून, हे रस्ते, खड्डे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com