चौथ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी ९ एक्सप्रेस रद्द

चौथ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी ९ एक्सप्रेस रद्द
railway
railway
Published On

जळगाव : नांदगाव येथील मेगाब्लॉकमुळे गाड्यांना विलंब होऊन प्रवाशांचे हाल झाले असताना आता पुन्हा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाईनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द केल्या आहेत. (jalgaon-news-nine-express-canceled-for-work-of-4th-railway-line)

railway
नांदेडमध्‍ये दक्षिण आफ्रीकेतून आलेले तीघे कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रोन संशयीत

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (Railway) बिलासपूर विभागाच्या बीआरजेएन- आयबी विभागासाठी बीआरजेएन येथे चौथी लाईनच्या कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी नॉन इंटरलोकींग कार्यक्रम एसइसीआरच्या पत्रनुसार खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात भुसावळ (Bhusawal) विभागातून जाणाऱ्या गाड्या रद्द केलेल्या आहे. यामुळे ऐन नाताळच्या सुटीत व नववर्ष साजरे करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

हावडा- मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (Hawda Mumbai Express) २४ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तर मुंबई- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी २६ डिसेंबरला रद्द. लोकमान्य टिळक हटियाएक्स्प्रेस २४ ते २७ डिसेंबरपर्यंत रद्द, लोकमान्य टिळक पुरी एक्स्प्रेस २८ आणि ३० डिसेंबरला रद्द, भुवनेश्वर एक्स्प्रेस २३ ते २९ डिसेंबरदरम्यान, कामाख्या एक्स्प्रेस २५ ते २८ दरम्यान रद्द केली आहे. मुंबई- हावडा एक्स्प्रेस २६ ते २८ डिसेंबरदरम्यान, शालीमार एक्स्प्रेस २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच पोरबंदर एक्स्प्रेस २४ व २६ डिसेंबरला रद्द. साईनगर– शिर्डी एक्स्प्रेस २३ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत रद्द, अशी माहिती भुसावळ रेल्वे (Bhusawal Railway) प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com