येणाऱ्या काळात लव जिहाद विरोधात मोहीम; नवनीत राणा

येणाऱ्या काळात लव जिहाद विरोधात मोहीम; नवनीत राणा
Navneet Rana
Navneet RanaSaam tv
Published On

जळगाव : अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात लव जिहादच्या (Love Jihad) विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारणार आहोत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मदत करण्याचे काम आम्ही करू; असे मत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सांगितले. (Jalgaon News Navneet Rana)

Navneet Rana
Nandurbar News : भारनियमनास कंटाळून युवा शेतक-यानं संपवलं जीवन

जळगाव (Jalgaon) शहरात खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी राणा दाम्पत्याने मंडळाच्या बाप्पाच्या दर्शन घेत आरती केली. यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना खासदार राणा बोलत होत्‍या.

आमच्या कणाकणात हनुमानजी

आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचे संकट दूर करणे हा आमचा हेतू होता. हनुमान चालीसाचे पठण केले. त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारने जेलमध्ये टाकले होते. आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला 14 दिवस जेलमध्ये राहावे लागले.

ठाकरेंना शिक्षा भोगावी लागली

मी एक महिला आहे. त्याशिवाय 25 लाख लोकांमधून निवडून गेलेली खासदार देखील आहे त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदार संघापुरतं नाहीतर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. असे असताना उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचे काम केले. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून ही तर सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला. ज्याचा वध करायचा होता त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले. अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com