शिवसैनिकांवर खोटे गुन्हे, तरी उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकले नाही; आमदार चंद्रकांत पाटील

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे, तरी उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकले नाही; आमदार चंद्रकांत पाटील
chandrakant patil
chandrakant patilSaam tv
Published On

मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्ताईनगरात पराभूत उमेदवारांना पाठबळ दिले जात होते. आमच्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तरी ते आमचे ऐकत नव्हते. या कठीण काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमच्या मदतीला धावून आले. हीच व्यथा शिवसेनेच्या (Shiv Sena) सर्व आमदारांची असतांना आमच्या असंतोषाला त्यांच्या रूपाने जनक मिळाले आणि राज्यात सत्तांतर घडले. अशा शब्दात अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (jalgaon news muktainagar mla chandrakant patil statement for uddhav thackeray)

chandrakant patil
अंगणवाडीतील पोषण आहारावर डल्‍ला; महिन्‍यातून एकदाच भरते अंगणवाडी

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे मुक्‍ताईनगरात भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार पाटील यांनी राज्‍यात सत्‍तांतर का झाले? याबाबत संवाद साधला.

शिवसेना कोणाची?

बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की शिवसेना आमची आहे. (Uddhav Thackeray) उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे, बाळासाहेबांचीच शिवसेना आहे असे सांगून उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालो नाही. शिवसेनेतच आहोत असे मत त्‍यांनी मांडले. फक्त आमच्यात जो असंतोष होता; तो आम्ही स्पष्ट केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com