अंगणवाडीतील पोषण आहारावर डल्‍ला; महिन्‍यातून एकदाच भरते अंगणवाडी

अंगणवाडीतील पोषण आहारावर डल्‍ला; महिन्‍यातून एकदाच भरते अंगणवाडी
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : लहान मुलांसाठी सुरू केलेल्‍या अंगणवाडीतून प्राथमिक ज्ञान व पोषण आहार पुरविला जातो. परंतु, खरटी येथील अंगणवाडी मनाप्रमाणे भरवून मुलांना दिल्‍या जात असलेल्‍या पोषण आहारावर शिक्षीकाच (Dhule News) डल्‍ला मारत असल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. (dhule news Anganwadi is open only once in a month)

Dhule News
जखमी वारकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद; मदतही केली जाहीर

साक्री (Sakri) तालुक्यातील खरटी या गावामध्ये असलेल्‍या अंगणवाडीतील (Anganwadi) शिक्षिका येतच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी लावला आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी प्रशासनातर्फे दिला जाणारा पोषण आहार देखील प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या आहारापेक्षा खूपच कमी प्रमाणात दिला जात असून अंगणवाडी शिक्षकांतर्फे यामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे लावण्यात आला आहे.

पंधरा– वीस मिनिटांकरीताच भरते अंगणवाडी

शासनाच्या नियमानुसार सुट्टीचा वार वगळता इतर दिवशी दररोज अंगणवाडी भरवणे आवश्यक आहे. मात्र अंगणवाडी शिक्षकांतर्फे मनमानी कारभार सुरू ठेवत महिन्यातून एकदाच अंगणवाडी भरविली जात असते. त्यातही ज्या दिवशी अंगणवाडीचे वर्ग भरविले जातात; तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या वरती हे वर्ग सुरू ठेवले जात नसल्याचे ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले आहे. या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली असून याबाबत संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत या अंगणवाडी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com