जखमी वारकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद; मदतही केली जाहीर

जखमी वारकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद; मदतही केली जाहीर
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा व्हिडिओ कॉलद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधून दिला. (sangli news eknath Shinde interacted with injured Warakaris video call)

Sangli News
वऱ्हाड्यांच्या गाडीचा अपघात; पंधरा जण जखमी

मिरज– पंढरपूर (Pandharpur) हायवेवर दोन दिवसांपूर्वी केरेवाडी फाट्यावर वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात (Accident) झाला होता. यामध्ये १७ वारकरी जखमी झाले होते. या जखमींवर मिरज जिल्‍हा हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील डॉक्टरांशी संवाद साधत योग्य ती मदत आणि योग्य तो उपचार करावा; अशा सूचना दिल्या होत्या.

प्रत्‍येकी २५ हजाराची मदत

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी आज मिरजमध्ये भेट घेऊन उपचार घेणाऱ्या वारकऱ्यांची चौकशी केली. तसेच आमदार अनिल बाबर यांनी यावेळी वारकऱ्यांशी भेट घेत मुख्यमंत्र्यांच्यावतीने १७ जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com