नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्‍हणूनच कोकणावर संकट : मंत्री पाटील

नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्‍हणूनच कोकणावर संकट : मंत्री पाटील
Narayan rane gulabrao patil
Narayan rane gulabrao patil
Published On

जळगाव : राज्‍यावर मोठे संकट आहे. अशात राजकारण करायला नको. राज्‍यावर आलेल्‍या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्‍याने राज्‍यावर संकट आल्‍याचे वक्‍तव्‍य केले. परंतु, राणे हे केंद्रीय मंत्री झाले व कोकणावर संकट आले म्‍हणजेच राणेच पांढऱ्या पायाचे असल्‍याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. (jalgaon-news-minister-gulabrao-patil-statment-kokan-rain-and-narayan-rane)

Narayan rane gulabrao patil
राणेंना मोठा लाडू भेटला; मग बोलणे गरजेचेच : पालकमंत्री गुलाबराव पाटील

राज्‍याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगावात आले असता त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला असताना त्‍यांनी राणे यांच्‍यावर निशाणा साधला. मंत्री पाटील म्‍हणाले, की राज्‍यावर आलेल्‍या संकटावर राजकारण करू नये. आलेल्‍या संकटात व्‍यक्‍ती म्‍हणून सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करायला एकसुती लढा द्यायला हवा. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेव्‍हा वेळ असते तेव्‍हा तुमचा झेंडा घेवून तुम्‍ही उतरा आमचा झेंडा घेवून आम्‍ही आखाड्यात उतरू. मात्र राज्‍य संकटात असताना राजकारण करणे योग्‍य नसल्‍याचे मत देखील त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com