ग्रामपंचायतीने पाच टक्‍के रक्‍कम दिव्‍यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक : पालकमंत्री पाटील

ग्रामपंचायतीने पाच टक्‍के रक्‍कम दिव्‍यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक ः पालकमंत्री गुलाबराव पाटील
ग्रामपंचायतीने पाच टक्‍के रक्‍कम दिव्‍यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक : पालकमंत्री पाटील
Published On: 

जळगाव : अगदी धडधाकट व्यक्तींनाही आयुष्यात खूप अडचणी येत असतात. तर दिव्यांगांच्या समस्या या यापेक्षा खूप भयंकर असतात. जर सर्वांना मदत करू शकतो; तर दिव्यांगांना मदत करणे ही परमेश्‍वरी सेवा असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (jalgaon-news-minister-gulabrao-patil-mla-fund-handicap-Distribution-of-materials)

जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार पटेल लेवा भवनात आयोजीत कार्यक्रमात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील ७६ दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेची मंजुरीपत्रे प्रदान करण्यात आली. तर आपण दिव्यागांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जळगाव पंचायत समिती सभापती ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी आदी महिला आघाडी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

साहित्‍य वाटप

मंत्री गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप करण्यात आले. यानंतर तालुक्यातील ७६ दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठीची मंजुरीपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. तपासणीतून निवडलेल्या दिव्यांगांना तीन चाकी सायकल, चेअर, एलबो स्टीक, व्हिल चेअर, कर्णयंत्र, अंधकाठी, वॉकींग स्टीक, वॉकर आदी साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.

ग्रामपंचायतीने पाच टक्‍के रक्‍कम दिव्‍यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक : पालकमंत्री पाटील
मंगरूळ धरण ‘ओव्हर फ्लो’; बारा गावांच्या जलपातळीत वाढ

पाच टक्‍के रक्‍कम दिव्‍यांगांसाठी बंधनकारक

मंत्री पाटील म्हणाले, की दिव्यांगांना आयुष्यात खूप अडचणी असतात. त्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगता कामा नये. राज्य शासनाने त्यांच्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या असून याची यशस्वी अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के रक्कम ही दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. कुठे या प्रकारचा निधी दिव्यांगांसाठी वापरला जात नसले तरी याची आपल्याकडे तक्रार करावी. याबाबत संबंधीतांवर नक्की कारवाई होईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.